शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पुस्तकांच्या गावी वर्षपूर्ती सोहळा शब्दचांदणे कार्यक्रम : भिलारला अ‍ॅम्फी थिएटरचे होणार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:02 IST

सातारा : पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारमधील या अभिनव उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत असून, दि. ४ मे रोजी या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये अ‍ॅम्फी थिएटरचे उद्घाटनही होणार असून, शब्दचांदणे हा

सातारा : पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारमधील या अभिनव उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत असून, दि. ४ मे रोजी या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये अ‍ॅम्फी थिएटरचे उद्घाटनही होणार असून, शब्दचांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.पुस्तकांच्या गावात ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनास दिलेल्या जमिनीवर सुमारे २५० रसिक आरामात बसून कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतील, असे खुले प्रेक्षागृह (अ‍ॅम्फी थिएटर) बांधून पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने, निसर्गरम्य ठिकाणी बांधण्यात आलेल्या या प्रेक्षागृहाचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या गावातील श्रीराम मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या या खुल्या प्रेक्षागृहात सायंकाळी पाचला शब्दचांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून विघ्नेश जोशी, निधी पटवर्धन, नचिकेत लेले, संदीप खरे, नंदेश उमप व कमलेश भडकमकर आदी कलाकार हा साहित्य व वाचनसंस्कृती या विषयीचा सांगीतिक-साहित्यिक कार्यक्रम सादर करणार आहेत.वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा, नाटक व चित्रपट, चित्रमय पुस्तके, कादंबरी (दालन २) व चरित्रे-आत्मचरित्रे (दालन २) या नव्या पाच दालनांचा (पुस्तक घरांचा) प्रारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, डॉ. माधवी वैद्य, मोनिका गजेंद्रगडकर, योगेश सोमण, ल. म. कडू, प्रदीप निफाडकर, अतुल कहाते, विश्वास कुरुंदकर, किशोर पाठक, विनायक रानडे आदी साहित्य क्षेत्रातील मान्यवर पुस्तकांच्या गावास भेट देणार आहेत, अशी माहिती मंत्री विनोद तावडे यांनी दिली.वाचनप्रेमींना आवाहन...भारतातील पहिले पुस्तकांचे गाव असलेले भिलार हे हजारो पर्यटक-वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहे. येथील निसर्गरम्य खुल्या प्रेक्षागृहात दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवर साहित्यिकांशी अनौपचारिक गप्पा आणि पुस्तकांचा सान्निध्य यांचा आनंद घेण्यासाठी वर्षपूर्ती सोहळ्याचे निमित्त साधून महाराष्ट्रातील वाचनप्रेमींनी या गावाला अवश्य भेट द्यावी, असे आग्रही आवाहनही मंत्री तावडे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थी